Stephen Hawking Information in Marathi | महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग मराठी माहिती

Stephen Hawking Information in Marathi – शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा परिचय करून देणे म्हणजे सूर्याला पणती दाखविणे असे आहे. कारण जगाला त्यांच्या परिचयाची गरज नाही. परंतु आज स्टीफन हॉकिंग यांच्या 82व्या जयंतीनिमित्त शिक्षणाच्या प्रवाहातील सर्वाना प्रेरणा मिळावी, शास्त्रज्ञांची माहिती व्हावी, शास्त्राज्ञाच्या कार्याविषयी माहित व्हावे या हेतूने माहिती देण्याचा प्रयत्न आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Stephen Hawking Information in Marathi

इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य असे काहीही नाही,असाध्य ते साध्य करता येते असेच कार्य Great Scientist Stephen Hawking यांचे आहे. त्यांना आलेल्या अकाली दिव्यांगत्व आले. आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करून वैज्ञानिक क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणारा दिव्यांग शास्त्रज्ञ म्हणून स्टीफन हॉकिंग यांचाकडे पाहिले जाते.

हे ही अवश्य वाचा हेलेन केलर विषयी मराठी माहिती 

Stephen Hawking Information in Marathi

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म आणि बालपण

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे सन 1942 साली 8 जानेवारी रोजी डॉ. फ्रॅंक आणि इसाबेल या दाम्पत्याच्या पोटी स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. फ्रॅंक आणि इसाबेल यांना तीन अपत्ये होती. स्टीफन यांचा जन्म श्रीमंत परिवारात झाले. त्यांचे वडील जैववैद्यकीय संशोधक होते आणि आई ऑक्सफर्डची वैद्यकीय संशोधन सचिव होत्या. बालपणापासून हुशार असलेल्या स्टीफन हॉकिंग यांना वाचनाबरोबर त्यांना विज्ञान विषयाची विलक्षण आवड होती. छोट्या छोट्या गोष्टीबाबत असेच का ? असा प्रश्न विचारात असत आणि त्या मागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत असत. स्टीफन हॉकिंग यांच्या जन्मानंतर यांनी सेंट अल्बांस येथे स्थलांतर केले कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालू होते.  Stephen Hawking Information in Marathi”

स्टीफन हॉकिंग यांचे शिक्षण

स्टीफन यांचे वडील डॉ. फ्रॅंक हे नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले नंतर अल्बांस येथून पुन्हा ऑक्सफर्ड येथे पुन्हा स्थलांतरित झाले आणि स्टीफन हॉकिंगचे शिक्षण येथे 1950 ते 1953 या काळात सुरु झाले.

वडिलांच्या इच्छेनुसार 1959 साली वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून “युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड” प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिप सुद्धा मिळाली. त्यांनी 1962 यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन हॉकिंग यांनी केंब्रिज विद्यापीठ येथे प्रवेश घेतला.

केंब्रिज विद्यापीठ मध्ये स्टीफन हॉकिंग यांनी संशोशांचे कार्य सुरु केले. गणित विषयातील त्यांच्या ज्ञानाची खोली पाहून त्यान येथेच प्राध्यापक म्हणून अध्यापन करण्याची जबाबदारी सोपवली गेली.

Stephen Hawking Information in Marathi

स्टीफन हॉकिंग यांचा आजार

अचानक विलक्षण अशा दुःखद अनुभवाला त्यांना सामोरे जावे लागले. सन 1962 साली सुट्यांसाठी स्टीफन आपल्या घरी गेले असता त्यांना अचानक कसातरी त्रास होऊ लागला. त्यांचे हे दुखणे वाढत गेले, ठीक ठिकाणी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण आजाराविषयी कुठेही स्पष्ट माहिती मिळत नव्हती.  8 जानेवारी 1963 रोजी, 21 व्या वाढदिवसाच्या दिवशीच स्टीफन यांना मोटर न्यूरॉन डिसीज (MND) हा असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या आजारात स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते.

  • सुरुवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो.
  • व्यक्ती अडख़ळत बोलू लागतो.
  • रुग्णास अन्न गिळतांना त्रास होतो. 
  • हळूहळू शारीरिक हालचालीवर मर्यादा येतात.

स्टीफन यांना मोटर न्यूरॉन डिसीज (MND) झालेल्या या आजाराचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांचे म्हणणे होते की, स्टीफन फक्त दोन वर्षे जगू शकेल. त्यांचे हे ऐकून स्टीफन हॉकिंग निराश झाले परंतु  हॉकिंग यांना दाखल करण्यात आलेल्या  दवाखान्यातच एक रुग्ण एका असाध्य रोगाशी झगडताना दिसून आला आणि त्यातून प्रेरणा घेऊन त्यांना आलेल्या असाध्य रोगातून सावरण्याचे  बळ मिळाले.

चालण्या फिरण्यासाठी स्टीफन व्हीलचेअरचा वापर करू लागले. बोलण्यातील अडथळा दूर करण्यासाठी  व्हीलचेअरला संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन हवे तेबोलात असत. परंतु 1985 साली त्यांना न्युमोनिया मुळे शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यात त्यांची पूर्णतः आवाज गेला. संगणक तज्ञाच्या मदतीने स्वतंत्र आज्ञावली लिहून त्याद्वारे स्टीफन यांनी आपले कार्य सुरु ठेवले. शारीरिक हालचाली मंदावल्या परंतु इच्छाशक्ती आणि मेंदू अद्याप कार्य करत होती. केवळ त्यांची इच्छाशक्ती जगाला नवनवे संशोधन दिली आहे.

स्टीफन हॉकिंग यांचे संशोधन

  • सिंगुलारीटी सिद्धांत 1970 – Singularity Theory 1970
  • ब्लॅक होल थेरी 1971-74 – Black hole Theory 1971-74
  • कॉस्मिक इन्फलेशन थेरी 1982 + Cosmic Inflation Theory 1982
  • वेव्ह फंक्शन वरील विश्वमॉडेल 1983 – Model of the Universe on wave function 1983
  • स्टीफन हॉकिंग कॉसमॉस जवळील टॉप डाऊन सिद्धांत 2006 – Stephen Hawking top Down theory near cosmos 2006

महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग मराठी माहिती

स्टीफन हॉकिंग यांनी त्यांच्या हयातीत अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी केवळ अंतरिक्ष या विषयावर लिहिले गेलेले काही पुस्तके आहेत. त्यातील काही पुस्तकांची नावे खाली दिलीआहे

 

  • अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम
  • द युनिव्हर्स इन अ नटशेल 
  • द ग्रँड डिझाईन
  • ब्लॅक होल आणि बेबी युनिव्हर्स

 

 

यातील ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांनी लिहिलेले प्रचंड लोकप्रिय पुस्तक या पुस्तकाच्या 33 आवृत्ती प्रसिद्ध झाले आहेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या पुस्तकाची नोंद केली गेली.

2001 साली त्यांनी आपला 59 वा वाढदिवस भारतातील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत साजरा केला. एक प्रकारे या महान शास्त्रज्ञाचे पाय भारत भूमीला स्पर्श झाले. अनेक पुरस्काराणी स्टीफन हॉकिंग यांना सन्मानित करण्यात आले. प्रतिफुल परिस्थितीवर जिद्दीने मात  करणारा विज्ञानाच्या क्षितिजावर तळपणारा दिव्यांग तारा म्हणजे स्टीफन हॉकिंग होय.

स्टीफन हॉकिंग यांचे निधन 

स्टीफन हॉकिंग मोटार न्युरोन डिसीज या आजारामुळे त्यांनी आयुष्यातील जवळपास 53 वर्षे व्हील चेअरवर घालवली आहेत. हळू हळू एक एक अवयव निकामी करणाऱ्या या आजारावर मात कर असताना 14 मार्च 2018 रोजी या महान शास्त्रज्ञाने इंग्लंडमध्ये अखेरचा श्वास घेतला आणि या जगाचा निरोप घेतला. मात्र विज्ञान क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही.

Leave a Comment

error: कॉपी करताय???