Vidya Samiksha Kendra: शाळा स्तरावरसुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती AI व मशीन लर्निंगच्या मदतीने माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्यातील शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील शैक्षणिक स्वास्थ्याचे अचूक निदान करता यावे, प्रत्येक स्तरावरील गरजांची निश्चिती करून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी नेमकेपणाने कृती कार्यक्रमांचे नियोजन, प्रभावी अंमलबजावणी, संनियंत्रण व अचूक मूल्यमापन करता यावे, यासाठी “विद्या समीक्षा केंद्र (VSK)” सुरू करण्याबाबत शासनास्तरावर विचार करण्यात यत होता. त्याबाबत आता शासन निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
Vidya Samiksha Kendra 2024 GR: शैक्षणिक स्वास्थ्याचे अचूक निदानासाठी राज्यात विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वयित करण्यात येणार
Vidya Samiksha Kendra GR: शैक्षणिक स्वास्थ्याचे अचूक निदानासाठी राज्यात विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वयित करण्यात येणार
त्यास अनुसरून शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना माहिती विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या नियंत्रणाखाली “विद्या समीक्षा केंद्र (VSK)” करण्याबाबत शासन स्तरवरून निर्णय घेण्यात येऊन ते सुरू करण्यात येत आहे.
हे ही वाचा – संकलित मूल्यमापन चाचणी -2 वेळापत्रक पहा
Vidya Samiksha Kendra Objective
विद्या समीक्षा केंद्राची उद्दिष्टे खालील प्रमाणे देण्यात आली आहेत.
- Samagra Shiksha व स्टार्स प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम / प्रकल्पांचे Real time संनियंत्रण.
- शैक्षणिक व भौतिक उपक्रम / योजनांचा राज्य स्तरावरून मागोवा घेणे आणि क्षेत्रिय अधिकारी व शिक्षक यांचे डेटा आधारित निर्णय घेण्यासाठी सक्षमीकरण.
- प्रवेशित विद्यार्थी, शालाबाह्य विद्यार्थी, गळती झालेले विद्यार्थी, मुक्त शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट बालकामगार, दिव्यांग विद्यार्थी, व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण, शिष्यवृत्ती, आर्थिक लाभाच्या योजना, शाळास्तरावरील मूल्यमापन, विद्यार्थी व शिक्षक यांना आवश्यक मदत, प्रोत्साहन व पुरस्कार इ. बाबींवर लक्ष ठेवणे.
- विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी व उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी शिक्षकांना मदत करणे.
- डेटा आधारे तातडीने लक्ष देण्यासाठीची गरजाक्षेत्रे निश्चित करून निर्णय घेण्यासाठी मदत करणे.
- शिक्षण व्यवस्थेस पूरक ठरणाऱ्या सर्व संबंधितास माहिती, जागरुकता आणि मदत करण्यासाठी राज्यस्तरावर मदत कक्ष (Help Desk) तयार करणे.
- सुनिश्चित शाळा मानकांनुसार शाळांची सद्यस्थिती व सुधारात्मक कामगिरीचा Real Time माहिती दर्शविणारा डॅशबोर्ड विकसित करणे.
- राज्यातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेतील समन्वय वाढवून त्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवणे.
- राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम / योजना / प्रकल्पांचे Real time संनियंत्रण करणे.
- Samagra Shiksha, STARS Project, पी.एम.श्री. तसेच शासनाचे विविध उपक्रम / योजना / प्रकल्पांचे वार्षिक कार्ययोजना व अंदाज पत्रक तयार करण्यास व शासन स्तरावर धोरण निश्चितीस मदत करणे.
- शिक्षण व्यवस्थेतील सर्व संस्थांच्या लेखा व वित्त विषयक बाबींचे डॅशबोर्ड विकसित करून संनियंत्रण करणे.
VSK अंतर्गत सहभागी संस्थांची भूमिका
VSK अंतर्गत शिक्षण आयुक्तालयाची भूमिका
- Vidya Samiksha Kendraच्या कामकाजासंदर्भात सर्व संचालनालयांमध्ये समन्वय राहणे व अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर येणाऱ्या अडचणी दूर करणे यासाठी आयुक्त (शिक्षण) हे दरमहा आढावा घेऊन दिशानिर्देश देतील. तसेच सर्व संचालनालयांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतील.
- शिक्षण विभागांतर्गत सर्व संचालनालयांकडून विद्या समीक्षा केंद्रासाठी प्रत्येकी एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती आयुक्त (शिक्षण) यांचेद्वारे करण्यात येईल. सदर नोडल अधिकारी आपल्या कार्यालयाशी संबंधित डॅशबोर्ड अद्ययावत ठेवण्यास जबाबदार राहतील.
- शालेय शिक्षण विभागाच्या E-Governance Cell द्वारे विद्या समीक्षा केंद्रासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल.
VSKअंतर्गत MPSP ची भूमिका
विद्या समिक्षा केंद्राचे कार्यानव्यन करण्यासाठी Software, Hardware and Infrastructure इत्यादींसाठी आवश्यक निधी समग्र शिक्षा/स्टार्स प्रकल्पा अंतर्गत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना उपलब्ध करून देण्यात येईल.
VSK अंतर्गत SCERT ची भूमिका
- दैनंदिन कार्यालयीन व्यवस्थापन केले जाईल.
- शिक्षण विभागाव्यतिरिक्त अन्य शासकीय विभागांचा सहभाग घेण्यासाठी योग्य कार्यवाही करतील.
- विद्या समीक्षा केंद्रातील शैक्षणिक कामकाजासाठी विद्या समन्वयक (Academic Coordinator) म्हणून शिक्षक संवर्गातून आवश्यकतेनुसार मनुष्यबळ प्रतिनियुक्ती / उसनवार तत्वावर उपलब्ध करून घेतील. तसेच संगणक प्रोग्रॅमर / सहाय्यक संगणक प्रोग्रॅमर, Data Scientist, तांत्रिक मनुष्यबळ तसेच स्वच्छता व सेवकवर्गीय कर्मचारी बाह्य संस्थांकडून उपलब्ध करून घेतील.
- विद्या समीक्षा केंद्राकरिता डेटा सिस्टीम व डॅशबोर्ड विकसित करण्यासाठी तसेच अन्य बाबींसाठी विविध संस्थांसोबत करारनामा करण्याचे अधिकार यांना असतील.
- प्रशिक्षण वा गुणवत्तेसंबंधात ज्या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत होत असेल तर त्यासंबंधीचा डॅशबोर्ड अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी असेल.
VSK अंतर्गत शिक्षण संचालनालयची भूमिका
संबंधित विषयाच्या डॅशबोर्ड विकसनाच्या प्रक्रियेत संबंधित संचालनालये सक्रीय सहभाग घेतील. आणि संबंधीत डॅशबोर्ड वरील डेटाचे विश्लेषण करून संबंधित संचालनालये कृती कार्यक्रमाची आखणी करतील.
VSK अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयची भूमिका
- विभागीय शिक्षण उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि. प.), आयुक्त (म.न.पा.), शिक्षणाधिकारी आपल्या कार्यकक्षेतील प्रगतीचा दरमहा आढावा घेतील.
- विद्या समीक्षा केंद्राच्या डॅशबोर्डवरील अहवाल जिल्हास्तरावरून तालुका व केंद्रस्तरावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उपलब्ध माहितीवर आधारित कृती कार्यक्रम जिल्हास्तरावर निश्चित करावा व त्याची अंमलबजावणी करावी.
- माहिती संकलनाची कोणत्याही स्वरुपात द्विरुक्ती होणार नाही यांबाबत क्षेत्रिय कार्यालये दक्षता घेतील.
- सुधारात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने करण्यात येईल.
- जिल्हास्तरावर उपशिक्षणाधिकारी, समग्र शिक्षा व मुंबई शहर, उपनगर या करिता समकक्ष अधिकारी हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.
VSK ची कार्यपध्दती
- संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे हे नामांकित संस्थांच्या मदतीने माहिती संकलित व विश्लेषित करण्यासाठी आवश्यक यंत्रणा विकसित करतील.
- सदर यंत्रणा विकसित करण्यासाठी शासनाच्या सरल, शालार्थ, सेवार्थ, यु-डायस पोर्टल व संबधित शासकीय संस्थांकडील डेटाबेसचा उपयोग करण्यात येईल.
- विकसित केलेल्या Chatbot / App / Platform इत्यादींद्वारे शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती, विविध लाभाच्या योजना, प्रशिक्षणे, चाचण्या, शाळाभेटी इत्यादी बाबींची माहिती विद्या समीक्षा केंद्राच्या सर्व्हरवर संकलित केली जाईल.
- VSKच्या डॅशबोर्डमध्ये उपलब्ध विविध प्रकारच्या माहितीचा अहवाल तयार होईल.
- माहितीचा अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य / योजना) यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून दिला जाईल.
- VSK मार्फत संकलित केली जाणारी माहिती अन्य संस्थांकडून Chatbot / App / Platform / Links द्वारा संकलित केली जाणार नाही किंवा त्याची द्विरुक्ती होणार नाही याबाबतची दक्षता राज्य व जिल्हा स्तरावर घेण्यात येईल.
- ज्या संस्था VSKच्या माहिती व्यतिरिक्त शिक्षण विभागाशी संबधित इतर माहिती संकलित करीत असतील त्यांनी प्रस्तुत माहिती ही विद्या समीक्षा केंद्राच्या सर्व्हरवर संकलित करणे बंधनकारक राहील.
- VSKमार्फत संकलित माहिती शाळांकडून अहवाल स्वरुपात कोणत्याही स्तरावरून मागविली जाणार नाही. जेणेकरून शिक्षकांच्या कामकाजात वाढ होणार नाही.
VSK ची प्रत्यक्ष अंमलबजावणी
- स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ.1 ली ते इ 10 वीच्या इयत्तेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. या बाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आयुक्त (शिक्षण) यांचेद्वारा निर्गमित करण्यात येतील.
- दिक्षा, निष्ठा, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS), राज्य संपादणूक सर्वेक्षण (SLAS) PGI, पी.एम. पोषण, यु-डायस व Periodic Assesment Test (PAT) यांचे डॅशबोर्ड संबंधित विभागांकडून प्रसारित करण्यात येत आहेत.
- विद्यार्थ्यांच्या सरावासाठी ऑनलाईन पद्धतीने इ. 2री व 3री साठी भाषा व गणित या विषयाचा तर इ. 4थी ते 4 वी साठी भाषा, गणित व विज्ञान या विषयांचा अध्ययन निष्पत्ती निहाय साप्ताहिक स्वाध्याय सुरु करण्यात येत आहे.
- टप्याटप्याने इतर उपक्रम सुरु करण्याविषयीच्या सूचना संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेद्वारा स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.
- सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक 202403121753077921असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.