Thane Kotwal Bharti 2026: महसूल सेवक (कोतवाल) भरतीच्या ठाणे जिल्ह्यात 111 जागा; आज पासून फॉर्म भरा

Thane Kotwal Bharti 2026: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे कारण ठाणे जिल्ह्यात किमान चौथी उतीर्ण असणाऱ्या उमेदवारासाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे.  ठाणे महसूल विभागाच्या वतीने Thane Kotwal Bharti 2026 भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. महसूल सेवक (कोतवाल) भरती बाबत संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane Kotwal Bharti 2026 Vacancy

ठाणे जिल्ह्यात खाली दिलेल्या तालुका निहाय महसूल सेवक (कोतवाल) भरती केली जाणार आहे.

  • ठाणे 24 जागा
  • भिवंडी 14 जागा
  • कल्याण 14 जागा
  • अंबरनाथ 21 जागा
  • मुरबाड 19 जागा
  • शहापूर 19 जागा
  • एकूण 111 जागा

Thane Kotwal Bharti 2026 Eligibility 

  • उमेदवार किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
  • अर्जदाराचे वय किमान 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. शासन निर्णयानुसार आरक्षित संवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट राहील.
  • उमेदवार ज्या तालुक्यासाठी अर्ज करत आहे तो त्या तालुक्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ व सक्षम असावा, तसेच सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

Thane Kotwal Bharti 2026 अर्ज कसा भरावा 

  • अर्जदाराने ऑनलाइन अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व इंग्रजीतून भरणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज 07ऑक्टोबर 2026 ते 21 ऑक्टोबर 2026 रोजी पर्यंत सादर करता येतील.
  • फोटो व स्वाक्षरी JPG/PNG स्वरूपात तर जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व रहिवासी दाखला हे PDF (कमाल 200 KB) स्वरूपात अपलोड करावेत.
  • ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर बँक खात्यातून रक्कम वजा झाल्यास किमान 24तास प्रतीक्षा करावी, तत्काळ दुबार पेमेंट करू नये.
  • अर्ज यशस्वीरीत्या जमा झाल्यानंतर ‘Reprint Application’ पर्यायावरून अर्जाची छापील प्रत जपून ठेवावी.
  • प्रवेशपत्र (Admit Card): लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

Thane Kotwal Bharti 2026 online form link 

https://thane.kotwal.org/

https://thane.kotwal.org/Home/Index

उमेदवारांसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना

  • उमेदवारांनी ज्या तालुक्यातील सजेसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या तालुक्याची अधिकृत जाहिरात (PDF) डाऊनलोड करून शैक्षणिक पात्रता, वय, स्थानिक रहिवासी अट व आरक्षण काळजीपूर्वक तपासावे.
  • संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सर्व उपविभागांतील पदांसाठी एकाच दिवशी, एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार असल्याने उमेदवाराने केवळ एकाच सजेत अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे, सही व फोटो स्पष्टपणे अपलोड करणे अनिवार्य आहे.

Thane-Kotwal-Bharti-2026

Leave a Comment

error: कॉपी करताय???