Netaji Subhash Chandra Bose Jayanti 2025 | नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती मराठी माहिती

Netaji Subhash Chandra Bose Jayanti 2025 : भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे महान नायक म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस  यांच्याकडे पहिले जाते. त्यांची आज 129 वी जयंती आहे. संपूर्ण देश हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, जय हिंद सारख्या अनेक घोषणांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नवी ऊर्जा भरणारे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म शाळा महाविद्यालयामधून  साजरा केला जातो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Netaji Subhash Chandra Bose Jayanti 2025

Netaji Subhash Chandra Bose Jayanti 2025 | नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती मराठी माहिती

Netaji Subhash Chandra Bose यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशा मधील  कटक येथे झाला. नेताजींचे जीवन आणि देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणून Netaji Subhash Chandra Bose Jayanti 2025 निमित्त याठिकाणी माहिती पाहत आहोत.

नेताजी सुभाषचंद्र बोस – अल्प परिचय

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म  दि.23 जानेवारी, 1897 रोजी झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती. नेताजी ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी. सुभाषबाबूंचे घराणे मूळचे माहिनगरचे (बंगाल). त्यांचे वडील जानकीनाथ वकिलीच्या व्यवसायानिमित्त कटकला (ओरिसा) आले. तेथेच सुभाषचंद्रांचा जन्म झाला. आई प्रभावतीदेवींनी बालवयात त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत महत्त्वाचे आहेत.

Netaji Subhash Chandra Bose information in marathi

दि. 26 जानेवारी, 1941 रोजी ते जर्मनीत गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी हिंदी लोकांना ब्रिटिशांविरुद्ध लढ्यास प्रवृत्त केले आणि बर्लिन आकाशवाणीवरून ते देशबांधवांना सातत्याने आवाहन करीत राहिले. जर्मनी-इटलीमधील भारतीय सैनिकांना भेटून त्यांनी आपले मनोगत सांगितले व ब्रिटिशांविरुद्ध संघटित होण्याचे आवाहन केले.

जपान येथे आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यासाठी देशाबाहेर दुसरी आघाडी उघडली. दि. 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनापती झाले. या शासनाला जपान, जर्मनी, इटली, ब्रह्मदेश आदी अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली. या सरकारने इंग्लंड-अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारून स्वतःची तिकिटे व नोटाही काढल्या. जपानने अंदमान, निकोबार व जित बेटांचा ताबा या सरकारकडे सोपविला. ब्रह्मदेशामधून आझाद हिंद सेना भारताच्या दिशेने पुढे गेल्या, इंफाळ येथे लढाईला तोंड फुटले, परंतु तेथे आझाद हिंद सेनेला नैसर्गिक आपत्तीमुळे माघार घ्यावी लागली.

नेताजी सुभाषचंद्र बोस जीवन आणि कार्ये

महायुद्धात जर्मनी-इटली व नंतर जपानचा पराभव झाला जपानने 15 ऑगस्ट 1985 रोजी शरणांगती पत्करली. त्या वेळी त्यांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. मांचुरियाहून त्याना धाडण्याची व्यवस्था फिल्ड मार्शल ताराऊ याने केली.

सायगावहून दि. 17 ऑगस्ट, 1985 रोजी त्यांनी प्रयाण केले. मार्गावर दि. 18 ऑगस्ट, 1985 रोजी तेपे (तैवान) येथील विमानतळावर विमानास अपघात होऊन त्याचे निधन आले. आझाद हिंद सरकारच्या स्थापनेनंतर त्यांनी स्वीकारलेले राष्ट्रगीत हेच स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत बनले.

स्रोत सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ


स्वामी विवेकानंद यांची जयंती मराठी निबंध

भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. स्वामी विवेकानंद हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. ते पाश्चात्य गूढवादाने प्रभावित झाले. तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली आहे.

विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे. तसेच 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय स्वामी विवेकानंदांना दिले जाते.


निबंध क्रमांक 01

सुभाषचंद्र बोस हे भारताचे एक महान क्रांतिकारी नेता होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसामधील कटक या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी असे होते. स्वामी विवेकानंद यांना मोठ्या आदराने नेताजी असे म्हटले जाते सुभाषचंद्र बोस हे लहानपणापासून खूप स्वाभिमानी तसेच देशप्रेमी होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामलातील प्रमुख नेता होते. त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा. ही प्रसिद्ध घोषणा दिली. दिनांक 18 ऑगस्ट 1945 मध्ये ताईवान येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले असे म्हटले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो.


निबंध क्रमांक 02

नेताजी सुभाषचंद्र बोस एक महान देशभक्त व शूर स्वातंत्र्यसैनिक होते त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसा येथील कटक या शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस व आईचे नाव प्रभावती देवी असे होते.

सुभाष चंद्र बोस यांनी कोलकत्ता येथे आपले शिक्षण पूर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तेथे ते भारतीय नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांनी इंग्रजांची नोकरी स्वीकारली परंतु इंग्रजांच्या क्रूर आणि वाईट वागणुकीमुळे देशवासियांची दयनीय अवस्था पाहून नोकरीचा राजीनामा दिला. तसेच तेथून ते परत आले आणि त्यांनी राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला.
भारताला स्वतंत्र करण्यासाठी काँग्रेस बरोबर अन नेताजींनी अनेक चळवळीत भाग घेतला नेताजीवर अनेक क्रांतिकारी विचारांचा प्रभाव पडला होता. त्यांनी जनतेसमोर केलेली भाषणे म्हणजे पेटत्या माशालू होत्या.
सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. जय हिंद तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा तसेच चलो दिल्ली अशा घोषणा देऊन भारतीयांना प्रेरित केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 18 ऑगस्ट 1945 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाल्याचे मानले जाते. नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे महान कार्य आणि योगदान भारतीय इतिहासात अविस्मरणीय आहे. धन्यवाद

Leave a Comment

error: कॉपी करताय???