MAHATET Result 2025: शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर; असा पहा निकाल

MAHATET Result 2025: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५च्या निकाला बाबत नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार MAHATET Result 2025 जारी करण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निकालाविषयी संपूर्ण माहिती आणि लिंक खालीलप्रमाणे पहा

MAHATET Result 2025

MAHATET Result 2025

शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी निवेदनानुसार शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट, 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maha TET Exam) दि. 23/11/2025 रोजी करण्यात आले होते.

MAHATET Final Answer Key

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 ची अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. 12 /01/2026 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. MAHATET FINAL Answer Key पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

MAHATET Result 2025 Link

पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवार / परीक्षर्थ्यांचा अंतरिम निकाल दिनांक 16/01/2026 रोजी http://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवार/परीक्षर्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी 6:00 वाजल्यापासून पाहता येईल.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अंतरिम निकाल गुणपडताळणी अथवा त्रुटी/आक्षेप

अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी/आक्षेप असल्यास https://www.mahatet.in/ या संकेतस्थळावर दिनांक 16/01/2026 ते दिनांक 21/01/2026रोजी सांयकाळी 6:00 वाजे पर्यंत उमेदवार / परीक्षार्थीना लॉगीन मधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येईल.

अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची संबंधित सर्व उमेदवार / परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.

mahatet result 2025

How to check TET Result 2025

  • MAHATET Result 2025 पाहत असताना हा अंतरिम निकाल असल्यामुळे विद्यार्थी / परीक्षार्थीना प्रथम mahatet.in संकेतस्थळावर लॉगीन करून घ्यावे लागेल.
  • लॉगीन केल्यानंतर विद्यार्थ्यांना अंतरिम निकाल TAB दिसेल.
  • अंतरिम निकाल TAB वर क्लिक करून अंतरिम निकाल पाहता येईल.

 

8 thoughts on “MAHATET Result 2025: शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर; असा पहा निकाल”

Leave a Comment

error: कॉपी करताय???