RTE Admission Last Date 2026: मुदतवाढ आरटीई प्रवेश अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ; पहा जिल्हानिहाय अर्जाची संख्या

RTE Admission Last Date 2026: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता पालकांना RTE Admission Last Date 2026 – 31 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत दोन लाख 79 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE Admission Last Date 2026

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाने एक किलोमीटरच्या अंतरातील शाळा निवडण्याची घातलेली अट उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आधी अर्ज भरलेल्या पालकांना पुन्हा अर्ज करण्यासाठी, तसेच अर्ज न भरलेल्या पालकांनाही अर्ज करण्याची संधी दिली.

RTE Online form 2026-27 link

RTE Admission 2024-25 Registration Link क्लिक करा

RTE Admission 2026 -27 Registration Link for Parent Student  क्लिक करा

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

यंदा प्रवेश प्रक्रियेंतर्गत आठ हजार 700 शाळांमधील प्रवेशासाठी एक लाख 14 हजार 785 जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत  दोन लाख 79 हजारांहून अधिक अर्ज दाखल आरटीई झाल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून आले. आता शिक्षण संचालनालयाने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिल्याने त्यात आणखी अर्जाची भर पडणार आहे.

पावणेतीन लाखांहून अधिक अर्ज दाखल

जिल्हा जागा अर्ज
Ahilya Nagar 3765 8866
Akola 2056 5435
Amravati 2626 7731
Bhandara 925 2772
Bid 2425 5998
Buldana 2933 5987
Chandrapur 1651 3889
Ch. Sambhaji Nagar 4911 16566
Dharashiv 1286 2607
Dhule 1307 3508
Gadchiroli 544 971
Gondiya 1069 3372
Hingoli 893 2092
Jalgaon 3379 9471
Jalna 2602 4960
Kolhapur 3361 5122
Latur 2343 6444
Mumbai 4558 9899
Mumbai 1472 –“–
Nagpur 7081 24609
Nanded 2803 9109
Nandurbar 358 993
Nashik 5673 16751
Palghar 5685 5252
Parbhani 1554 3482
Pune 18060 53169
Raigarh 4784 9211
Ratnagiri 804 1035
Sangli 2152 3232
Satara 2134 4575
Sindhudurg 271 158
Solapur 2947 6357
Thane 11754 24217
Wardha 1390 3860
Washim 1007 2281
Yavatmal 2222 5444
Total 114785 279425

 

अंतर बाबत पालकांकरीता सूचना 

  • आर. टी. ई. २५% प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी असलेली 1 किलोमीटरची अट रद्द करण्यात आलेली आहे.
  • त्यामुळे ज्या पालकांनी 1 किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांची निवड करून फॉर्म सबमिट केला आहे, तसेच ज्या पालकांनी / विद्यार्थ्यांनी RTE २५% प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, त्यांना आता प्रवेशासाठी 1 किमी, 1 ते 3 किमी तसेच 3 किमी पेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत.
  • या अनुषंगाने संबंधित पालकांना पालक लॉगिनमध्ये Unconfirm करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे सर्व संबंधितांनी आपला सादर केलेला फॉर्म Unconfirm करून आवश्यक ती सुधारित माहिती नोंदवावी.

जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही.

  • एका बालकाचा एका पेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील. जन्म तारीख अथवा मोबाईल भरताना चुकल्यास तो अर्ज Delete करून पुन्हा नवीन अर्ज भरावा.
  • दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना पालकांनी Child Disability – Yes यावर क्लिक करावे

RTE Admission Last Date 2026

  • नावामध्ये थोडासा बदल जरी केला तर तो फॉर्म शोधून वगळून टाकण्यात येईल .
  • उदा .
    1. Abhijeet and Abhijit are same.
    2. Sameeksha – Samiksha
    3. Nitin – Neeteen – Netin
    4. Anup – Anuup – Aanup
    5. Vikram – Veekrm -Vikkaram
    6. Usuf – Yusuf – Yusuupf All are same. अशा सर्व शक्यता सिस्टिम मध्ये शोधून तो फॉर्म वगळून टाकण्यात येईल .
    चेक लिस्ट :DOB , बालकाचे पहिले नाव , वडिलांचे नाव , आडनाव आणि आईचे नाव .

Leave a Comment

error: कॉपी करताय???