DMER Recruitment 2025 : सुवर्णसंधी! वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात विविध पदांच्या 1107 जागांवर नवीन भरती सुरु

DMER Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग मुंबई अधिनस्त शासकीय वैद्यकीय/दंत महाविद्यालय व सलंग्नित रुग्णालयातील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धापरीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमदेवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. DMER Bharti 2025 ची जाहिरात आणि संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DMER Recruitment 2025 Website

सरळसेवा भरती प्रक्रियेशी संबधित ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष यांच्या https://www.med-edu.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

DMER Recruitment 2025

DMER Bharti 2025 साठी ऑनलाईन फॉर्म भरणे गुरुवार दि. 19 जून 2025 पासून स्पर्धा परीक्षा- 2025 या मथळयाखाली उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

DMER Recruitment 2025 Notification

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

DMER Bharti 2025 जाहिरात पहा

या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पध्दतीने भरलेला अर्ज व ऑनलाईन पध्दतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील.
इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज/परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

DMER Recruitment 2025 Details

  • भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व कार्यक्रम, वेळापत्रक, वेळापत्रकातील बदल इत्यादी सूचना कार्यालयाच्या https://www.med-edu.in/ या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.
  • सदर भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांशी कोणताही स्वतंत्रपणे पत्रव्यवहार करण्यात येणार नसून, सदर संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणा-या सूचनांची दखल घेवून त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
  • कोणत्याही वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झालेली जाहिरात तसेच कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणारी जाहिरात यामध्ये तफावत विसंगती आढळून आल्यास कार्यालयाच्या संकेतस्थळावरील जाहिरात अधिकृत समजण्यात येईल

Leave a Comment

error: कॉपी करताय???