Maha FYJC Admission 2025: अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक उद्या जाहीर होणार

Maha FYJC Admission 2025: इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भाने प्रत्यक्ष सुरुवात दिनांक 21 मे 2025 पासून सुरू होणार होती परंतु राज्यातील पालक, विद्यार्थी तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी व शिक्षणतज्ञ यांच्या अमूल्य नवीन सूचना आणि दिवसभराच्या तांत्रिक अडचणीमुळे हे प्रवेश प्रक्रिया संदर्भात नवीन वेळापत्रक जाहीर करण्याचे परिपत्रक/ प्रेस नोट देण्यात आले आहे. Maha FYJC Admission 2025 बाबत संपूर्ण माहिती खालील प्रमाणे परिपत्रकासह देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • अधिकृत संकेतस्थळ- https://mahafyjcadmissions.in
  • ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in
  • हेल्पलाईन नंबर 8530955564

Maha FYJC Admission 2025

शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रेस नोट प्रमाणे इ. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (FYJC Admission Process) सन 2025-26 दिनांक 19 मे, 2025 रोजी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रणालीचा विद्यार्थी व पालक यांचेसाठी सराव करणेकरीता पोर्टल सुरु करण्यात आले होते.

सराव करतेवेळी राज्यातील पालक, विद्यार्थी तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी व शिक्षणतज्ञ यांच्या अमूल्य सूचना प्राप्त झाल्या आहेत. सदरील सूचनांचा अंतरभाव ऑनलाईन प्रवेश प्रणालीमध्ये करण्यासाठी संबंधित तांत्रिक बदल करणेबाबत सूचित केले आहे.

यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार फेरी क्रमांक 01 चे सविस्तर दिनांक 19 मे 2025 ते 13 जून 2025 दरम्यानचे विद्यार्थी नोंदणी, प्राधान्यक्रम व उच्च माध्यमिक विद्यालयांची अलॉटमेंट इत्यादी बाबींच्या दिनांक जाहीर केल्या होत्या.

दिनांक 21 मे 2025 रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळाबाबत तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ योग्य प्रकारे विद्यार्थी नोंदणी व प्राध्यान्यक्रम कामकाज पूर्ण होऊ शकले नाही.

Maha FYJC Admission Timetable 2025-26

परिणामी यापुढे विद्यार्थी हित लक्षात घेता व तोंत्रिक बाबींची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, या बाबी लक्षात घेता इ.11वी प्रवेश प्रक्रियेचे सुधारीत वेळापत्रक दिनांक 22 मे,2025 दुपारी 3:00 वाजता फेरी क्रमांक 01 बाबतचे सविस्तर वेळापत्रक घोषित करण्यात येईल.

Maha FYJC Admission 2025

Maha FYJC Admission 2025-26 कालावधी 

  • पोर्टलवर अर्ज भरण्याची सुरुवात विलंबाने होत असले तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंतीक्रम नोंदविण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल.
  • प्रवेशाचे पोर्टल परिपूर्ण व उत्कृष्ट स्वरुपात उपलब्ध झालेले असेल. कोणतीही छोटयात छोटी त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
  • प्रवेशाचे पोर्टल सुरु होण्याची वेळ ऑनलाईन दर्शविण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना ई-मेल व मोबाईल संदेशाव्दारे कळविण्यात येईल.
  • त्रुटीसह अर्ज भरण्याचे सुविधा देण्याऐवजी पोर्टल सुलभ व त्रुटीरहित करून सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोईचे व सुलभ व्हावे व एकंदर प्रवेशाची कार्यवाही कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

Mahajyoti Tab Registration 2025-27: अर्ज करा; महाज्योती मोफत टॅब्लेट योजनेंतर्गत दहावी उतीर्ण विद्यार्थ्याना मिळणार टॅब्लेट

अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व उचित सोयी-सुविधा, मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना पुरविले जाईल तरी कोणीही गोंधळून जाऊ नये. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.

 

1 thought on “Maha FYJC Admission 2025: अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक उद्या जाहीर होणार”

Leave a Comment

error: कॉपी करताय???