Pavitra Portal Bharti 2022 Phase 2: महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- 2022” चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.

Pavitra Portal Bharti 2022 Phase 2: पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/ शिक्षक पदभरती जाहीर
सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले.
Pavitra Portal Bharti 2022
“TAIT-2022” मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता 1 ली ते 12 वी व अध्यापक विद्यालयातील शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांच्या भरतीचा प्रथम टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. सदर टप्प्यांतर्गत दिनांक 25/02/2024, दिनांक 25/05/2024, दिनांक 30/07/2024 व दिनांक 07/08/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय या प्रकारात यापूर्वी प्रथम टप्प्यात 21678 जाहिरातींच्या पदभरतीबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
Pavitra Portal Bharti 2022 Phase 2
- शासन पत्र दि. 10/09/2024 नुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- 2022 – दुसऱ्या टप्प्यांतर्गत आता शिक्षक निवडीची कार्यवाही करण्यात येत आहे.
- आता दुसऱ्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून व मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
- यात 18 जिल्हा परिषदांच्या 468, 13 मनपाच्या-362, 57 नगर पालिका /परिषदाच्या – 221 व 25 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 537अशा एकूण 1588 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे.
- तसेच मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांमध्ये 8733 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे.
Pavitra Portal Bharti 2022 Phase 2
- Pavitra Portal वर जाहिरातीतील रिक्त पदांचा व शिफारस झालेल्या यादी
- यादी डाउनलोड करा https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx
- यादी डाउनलोड करण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करावे
- त्यानंतर डाउनलोड या टॅब वर क्लिक करून यादी डाउनलोड करावे
Reservation wise Pavitra Portal Bharti 2022 Phase 2
- आरक्षणनिहाय रिक्त पदे अनुसूचित जाती-182, अनुसूचित जमाती-131, विमुक्त जाती (अ)- 46, भटक्या जमाती (ब)- 27, भटक्या जमाती (क)- 45, भटक्या जमाती (ड)- 31, विशेष मागास प्रवर्ग-22, इतर मागास प्रवर्ग-217, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक -137, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग-189, खुला-559 याप्रमाणे एकूण 1586 पदे आहेत.
- आरक्षणनिहाय शिफारस झालेले उमेदवार अनुसूचित जाती- 135, अनुसूचित जमाती- 64, विमुक्त जाती (अ)- 37, भटक्या जमाती (ब)- 26, भटक्या जमाती (क)-22, भटक्या जमाती (ड)-14, विशेष मागास प्रवर्ग-06, इतर मागास प्रवर्ग-168, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 107, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग-133, खुला-402 याप्रमाणे एकूण 1114 आहेत.
Group wise Pavitra Portal Bharti 2022 Phase 2
- गट निहाय रिक्त पदे: इ. 1 ते 5 वी 892, इ. 6ते 8 वी 322, इ. 9 ते 10 वी- 220, इ. 11 ते 12 वी -154 याप्रमाणे 1588 आहेत.
- गटनिहाय शिफारस झालेले उमेदवार इ. 1 ते 5वी 554, इ. 6 ते 8वी- 210, इ. *ते 10वी – 216, इ. 11 ते 12 वी 134 याप्रमाणे 1114 आहेत.
Medium wise Pavitra Portal Bharti 2022 Phase 2
- माध्यमनिहाय रिक्त पदे मराठी-1251, उर्दू- 258, हिन्दी- 53, तामिळ-02, बंगाली- 23, तेलुगू- 01 याप्रमाणे एकूण 1588 आहेत.
- माध्यमनिहाय शिफारस झालेले उमेदवार मराठी-963, उर्दू- 100, हिन्दी-35, बंगाली-16 याप्रमाणे एकूण 1114 आहेत.
उमेदवारांना दिनांक 11/03/2025 ते 21/03/2025 व दिनांक 10/04/2025 ते 14/04/2025 या कालावधीमध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे / दुरुस्त करणे याबाबतची सुविधा देण्यात आली होती.
उमेदवारांना दिनांक 25/04/2025 ते 02/05/2025 व दिनांक 06/05/2025 ते 08/05/2025 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा देण्यात आली होती.
मोफत टॅब्लेट योजना
Pavitra Portal Bharti 2022 Phase 2
दिनांक 21/05/2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्था व मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या पदभरतीची सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यानंतर मुलाखतीसह उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या मुलाखतीसाठीची कार्यवाही प्रसिद्ध करण्यात येईल.
पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित आपले म्हणणे/मागणी इत्यादी बाबी edupavitra२०२२@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल.