RTE Admission Maharashtra: RTE 2024-25 चा नवा कर्नाटक – पंबाज पॅटर्न! मुलांना आता ‘या’ शाळेत प्रवेश

RTE Admission Maharashtra: राज्यामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये RTE Admission प्रक्रिया सुरु होते. या वर्षी अद्याप ही प्रक्रिया सुरु झाली नाही. लवकरच आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियमध्ये पालकांना नवीन बदल दिसण्याची शक्यता अधिक आहे.  RTE 25% Admission Process मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. 2023-24 मध्ये 1 लाखापेक्षा अधिक मुलांना RTE  Online Admission प्रक्रियेमध्ये प्रवेश दिला गेला आहे. 2024-25 वर्षासाठी महाराष्ट्रामध्ये RTE चा नवा कर्नाटक – पंबाज पॅटर्न राबवला जाईल असे वर्तवण्यात येत आहे. तेव्हा पालकांना RTE चा नवा कर्नाटक – पंबाज पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर खालीलप्रमाणे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RTE Admission Maharashtra
RTE Admission Maharashtra

 

RTE Admission Maharashtra: RTE चा नवा कर्नाटक – पंबाज पॅटर्न! मुलांना आता ‘या’ शाळेत प्रवेश

जानेवारी संपला तरीदेखील यावर्षी बालकांच्या ‘आरटीई’ प्रवेशाला सुरवात झालेली नाही. नवीन वर्षातील इयत्ता पहिलीच्या प्रवेशाबाबत पालकामधून आतुरतेपोटी विचारणा होत आहे. परंतु राज्यामध्ये RTE प्रवेशाबाबत कर्नाटक व पंजाब पॅटर्नच्या धर्तीवर राज्यात ‘आरटीई’चा नवा पॅटर्न राबविला जाणार असल्याबाबत सांगण्यात येत आहे.

RTE Admission Maharashtra

आरटीई प्रवेश मध्ये राज्यातील तब्बल साडेआठ हजार खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 01 लाख पेक्षा जास्त (25 टक्के जागा) मुलांना इयत्ता पहिलीत शासनाच्या माध्यमातून RTE  Online Admission प्रक्रियेमध्ये प्रवेश दिला गेला आहे. यासाठी आरटीई  मोफत प्रवेश देण्यासाठी दरवर्षी ‘आरटीई’तून लॉटरी काढली जाते. या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्ती साठी प्रतिविद्यार्थी शासनाकडून 17 हजार 760 रुपयांचे शुल्क प्रवेश दिलेल्या खासगी शाळांना वितरित केले जाते. 

RTE Online Admission 2024-25

RTE प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

RTE मोफत प्रवेश संपूर्ण माहिती

RTE Admission School Maharashtra

राज्य शासनाच्या स्वत:च्या (जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका) 70हजारांहून अधिक शाळा  आहेत. शिवाय खासगी अनुदानित व अंशत: अनुदानितच्या 40 हजारांहून अधिक शाळा आहेत. शाळांची पटसंख्या कमी झाल्याने राज्यातील साडेबारा हजारांहून अधिक शाळामधील शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. असे असूनही दरवर्षी 900 कोटी रुपये खर्च करून साडेआठ हजार खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 01 लाख पेक्षा जास्त (25 टक्के जागा) मुलांना इयत्ता पहिलीत शासनाच्या माध्यमातून RTE  Online Admission प्रक्रियेमध्ये प्रवेश दिला जातो.

काय आहे RTE चा नवा कर्नाटक – पंबाज पॅटर्न!

  • कर्नाटक आणि पंजाब राज्यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यास त्याच्या घरापासून एक किमी अंतरावरील जि.प. महापालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित किंवा अंशत: अनुदानित शाळेत प्रवेश दिला जातो.
  • प्रवेशावेळी त्या मुलाच्या पालकांच्या पसंतीला प्राधान्य दिला जातो.
  • जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका किंवा शासकीय अनुदानित शाळा त्या परिसरात नसल्यासच संबंधित मुलांसाठी खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय दिला जातो.

का हवाय RTE Admission चा नवा पॅटर्न

  • RTE Admission Maharashtra तून पहिली ते आठवीपर्यंत मोफत इंग्रजी शाळांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचा खर्च परवडत नाही; त्यांना पुन्हा मराठी माध्यमातूनच शिकावे लागते आणि त्यातून अनेकजण नैराश्याचे शिकार होवू शकतात.
  • मराठी शाळांची पटसंख्या कमी होऊन सात ते आठ हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावरआहेत.
  • RTE Fees बाबत खासगी इंग्रजी शाळांकडून शासन दरबारी शुल्क वाढीची मागणी
  • आरटीई प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क सरकारी तिजोरीतून खासगी इंग्रजी शाळांना दिले जाते.
  • मराठी शाळांना घरघर लागलेली असताना हा पारंपारिक ‘आरटीई’चा पॅटर्न सरकारला न परवडणारा आहे.
  • दरवर्षी सरकारी तिजोरीतील 900 कोटी रुपये ‘आरटीई’ प्रवेशापोटी जातात हे परवडणारे नाही.
  • शैक्षणिक वर्ष 2022-23 पर्यंतचे खासगी इंग्रजी शाळांचे एक हजार 340 कोटी रुपयांचे प्रतिपूर्ती शुल्क थकलेले आहे.

अशी विविध कारणे बोलली जात आहेत. शिवाय वित्त विभागाने 2019 साली या पार्श्वभूमीवर असा प्रवेश बंद करण्याचा साला शालेय शिक्षण विभागाला दिला होता. असेही सांगण्यात येत आहे.

RTE Admission Maharashtra Date

राज्यामध्ये RTE Admission 2024-25 साठी पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. RTE 2024-25 चा नवा कर्नाटक – पंबाज पॅटर्न राबविण्यामागे RTE अंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत हा मूळ उद्देश आहे.

अवश्य वाचा – परीक्षा पे चर्चा 2024 भाग 1

अवश्य वाचा – परीक्षा पे चर्चा 2024 भाग 2

नव्या पॅटर्नमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यास त्याच्या घरापासून एक किमी अंतरावरील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित किंवा अंशत: अनुदानित शाळेत प्रवेश दिला जाईल. त्यावेळी त्या मुलाच्या पालकांच्या पसंतीला प्राधान्य राहील. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका किंवा शासकीय अनुदानित शाळा त्या परिसरात नसल्यासच संबंधित मुलांसाठी खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय असणार आहे.

FAQ वारंवार विचारली जाणारी प्रश्न

प्रश्न – महाराष्ट्रमध्ये RTE Admission प्रक्रिया कधी सुरु होणार आहे?

दरवर्षी महाराष्ट्रमध्ये RTE Admission प्रक्रिया जानेवारी मध्ये सुरु होते. यावर्षी ही प्रक्रिया फेब्रुवारी मध्ये सुरु होईल.

प्रश्न – मुंबईमध्ये RTE Admission प्रक्रिया कधी सुरु होणार आहे?

राज्यांमध्ये एकाच वेळी सर्व जिल्ह्यात RTE Admission प्रक्रिया सुरु होते.

प्रश्न – महाराष्ट्रामध्ये RTE Admission साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

महाराष्ट्रामध्ये RTE Admission साठीऑनलाईन वेबसाईट https://education.maharashtra.gov.in/ असून यावरील RTE  25% Admission या tab वर क्लिक करून दिलेल्या वेळेत ऑनलाईन फॉर्म भरू शकता.

प्रश्न – नवीन वर्षामध्ये RTE प्रवेश प्रक्रिया बंद होईल का?

नवीन वर्षामध्ये RTE प्रवेश पप्रक्रिया बंद होणार नाही. परंतु राज्यामध्ये RTE प्रवेशाबाबत कर्नाटक व पंजाब पॅटर्नच्या धर्तीवर राज्यात ‘आरटीई’चा नवा पॅटर्न राबविला जाणार असल्याबाबत सांगण्यात येत आहे.

 

 

Leave a Comment

error: कॉपी करताय???