Senior and Selection Grade Training 2025: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या वतीने वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणीसाठी दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून पोर्टल सुरु करण्यात आली आहे. ही प्रक्रिया दिनांक 06 मे 2024 रोजी रोजी सायंकाळी 06:00 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती.

Senior and Selection Grade Training 2025: वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीमधील दुरुस्ती सुरु
Senior and Selection Grade Training 2025 साठी ऑनलाईन प्रशिक्षण नावनोंदणी करत असताना काही पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गट यांची निवड करत असताना चुका केलेल्या आहेत. अशा प्रशिक्षणार्थ्याना दिनांक 07 मे 2025 रोजी सकाळी 11:00 वाजेपासून दिनांक 08 मे रोजी सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत आपण स्वतः निवड केलेल्या प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षण प्रकारच्या चुका दुरुस्ती करणेसाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. (परिपत्रक पहा)
Senior and Selection Grade Training 2025
तरी यानुसार केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक दुरुस्ती करावयाची आहे, केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यानी सदरच्या कालावधीमध्ये आवश्यक दुरुस्ती करावी. ज्या प्रशिक्षणार्थ्यांची नावनोंदणी अचूक झालेली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी कोणतीही दुरुस्ती यामध्ये नोंदवू नये. तसेच दुरुस्तीची ही अंतिम संधी प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. नमूद कालावधीनंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली जाणार नाही याची नोंद, नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यानी घ्यावी अशा सुचना आपल्यास्तरावरून सर्व नोंदणी केलेल्या पात्र प्रशिक्षणार्थ्यांना निर्गमित करण्यात याव्यात.
Senior and Selection Grade Training 2025 Correction
शालार्थ आश्रम शालार्थ / BMC स्टाफ आय. डी असलेल्या या पर्यायामधून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- आपल्या शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदविणे.
- निवड श्रेणी साठी पात्र प्रशिक्षणार्थी यांनी चुकीने वरिष्ठ श्रेणी मध्ये नोंदणी केले असणे, केवळ यासाठी प्रशिक्षण प्रकार दुरुस्ती करणे.
- प्रशिक्षण गट (प्राथमिक / माध्यमिक/उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालय) दुरुस्ती करणे.
- प्रशिक्षण गटामध्ये माध्यमिक/उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालय शिक्षकांनी कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नसताना चुकीने कला शिक्षक व क्रीडा शिक्षक अशी नोंदणी केली असणे. यासाठी दुरुस्ती करणे.
- नोंदणी दुरुस्ती लिंकसाठी इथे क्लिक करा
Senior and Selection Grade Training 2025
शालार्थ / आश्रम शालार्थ/ BMC स्टाफ आय. डी नसलेल्या या पर्यायामधून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- आपल्या शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदविणे,
- निवड श्रेणी साठी पात्र प्रशिक्षणार्थी यांनी चुकीने वरिष्ठ श्रेणी मध्ये नोंदणी केले असणे, केवळ यासाठी प्रशिक्षण प्रकार दुरुस्ती करणे.
- प्रशिक्षण गट (प्राथमिक / माध्यमिक/उच्च. माध्यमिक / अध्यापक विद्यालय) दुरुस्ती करणे.
- प्रशिक्षण गटामध्ये माध्यमिक / उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालय शिक्षकांनी कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नसताना चुकीने कला शिक्षक व क्रीडा शिक्षक अशी नोंदणी केली असणे, यासाठी दुरुस्ती करणे.
- शाळा व्यवस्थापन प्रकार दुरुस्त करणे.
असे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई. शिक्षणाधिकारी, (प्राथमिक / माध्यमिक), शिक्षण निरीक्षक (उत्तर/ पश्चिम/दक्षिण), मुंबई, प्रशासन अधिकारी, म.न.पा/ न.पा यांना कळविण्यात आले आहे.