Senior Grade Selection Grade Training 2026: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 करिता नाव नोंदणी करण्याबाबत नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आता राज्यातील पात्र शिक्षकांचे Senior Grade Selection Grade Training होणार आहे. सविस्तर माहिती व नावनोंदणी Grade Training Registration Link खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
Senior Grade Selection Grade Training 2026 | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी सुरु
- पोस्ट ऑफिसमध्ये GDS भरती करिता फॉर्म भरा
Senior Grade Selection Grade Training 2026
दिनांक 20 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन आणि यंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आली आहे. सबब शासन निर्णयानुसार हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे.
प्रशिक्षण कधी होणार आहे?
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण चे आयोजन जूनच्या पहिल्या आठवड्यात सुट्टी कालावधीमध्ये आयोजित करण्यात येते परंतु जनगणना कामामुळे हे प्रशिक्षण होऊ शकले नाही. त्यामुळे हे प्रशिक्षण आता दीपावलीच्या सुट्टी कालावधीत साधारण नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणकरिता पात्र शिक्षक कोण?
- राज्यातील ज्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक यासाठी पात्र आहेत.
- ज्या शिक्षकांची दि 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्हताकारी सेवेची 12/24 वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक पात्र आहेत.
- तसेच दि. 30 जून 2027 पर्यंत सेवानिवृत्त होणारे असे काही शिक्षक, मुख्याध्यापक हे 12/24 वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण करीत आहेत असे शिक्षक/ मुख्याध्यापक या करिता पात्र आहेत.
Senior Grade Selection Grade Training 2026 Link
वरील पात्र शिक्षकांनी दिनांक 09/09/2026 रोजी सकाळी 11:00 वाजेपासून दिनांक 16/09/2026 रोजी संध्याकाळी 06:00 पर्यंत खाली दिलेल्या लिंकवर प्रशिक्षण नोंदणी करता येणार आहे.

https://maa.ac.in/index.php?tcf=training
विशेषतः माहे एप्रिल व मे 2026 मध्ये वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण -2026 साठी ज्या शिक्षकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे,अशा शिक्षकांनी पुन्हा ऑनलाईन नोंदणी कराव्याची आवश्यकता नाही.
Senior Grade Selection Grade Training 2026 Fees
- सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी 2000/- दोन हजार रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे. एकदा करण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्क परताव्याबाबत परिषदेची कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी.
- प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणीची रिसिप्ट अथवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावे. म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी ईमेल प्रशिक्षण गट किंवा प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य धरण्यात येतात.
Senior Grade Selection Grade Training 2026 group
गट क्रमांक एक – प्राथमिक गट
यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा समावेश होतो. नोंदणी करताना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांनी हा गट निवडावा.
गट क्रमांक दोन – माध्यमिक गट
यामध्ये इयत्ता नववी ते दहावीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा समावेश होतो. नोंदणी करताना इयत्ता नववी ते दहावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांनी हा गट निवडावा.
गट क्रमांक तीन – उच्च माध्यमिक गट
यामध्ये इयत्ता अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा समावेश होतो. नोंदणी करताना इयत्ता अकरावी ते बारावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांनी हा गट निवडावा.
गट क्रमांक चार अध्यापक विद्यालयातील गट
यामध्ये अध्यापक विध्यालयात प्रथम व द्वितीय वर्षात अध्यापन करणारे अध्यापक विद्यालय शिक्षक यांचा समावेश होतो. नोंदणी करताना अध्यापक विद्यालयातील अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी हा गट निवडावा.
तांत्रिक सहायासाठी खालील नंबरवर संपर्क करावा
अभिनव भोसले (विषय सहाय्यक) – ८२०८८७९१५९ – कार्यालयीन वेळेत – ०९:४५ ते ०६:१५
तांत्रिक सहाय्य्य (ट्रायफ्रंड प्रायव्हेट लिमिटेड) – ९५११८७४३७३ – कार्यालयीन वेळेत – ०९:४५ ते ०६:१५