SSC HSC Exam Date 2027: दहावी बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2027 च्या तारखा जाहीर!

SSC HSC Exam Date 2027: ​महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेकडून फेब्रुवारी-मार्च 2027  मध्ये होणाऱ्या इयत्ता 10 वी SSC Exam (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ) आणि इयत्ता12 वी HSC Exam (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेच्या संभाव्य तारखांबाबतचे अधिकृत प्रकटन जाहीर करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC Exam Date 2027

विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जावे या उद्देशाने मंडळातर्फे यंदा वेळेपूर्वीच या संभाव्य तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही किंवा तुमचा पाल्य आगामी 2027  च्या Bord Exam करिता बसणार असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

SSC HSC Exam Date 2027 Time Table

  • दहावी आणि बारावी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया.
  • ​फेब्रुवारी-मार्च 2027 बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ​मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.

HSC Exam Date 2027

  • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा:​प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बुधवार, दि. 20 जानेवारी 2027 ते शनिवार, दि. 06 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेतल्या जाणार आहेत
  • HSC ​लेखी परीक्षा सोमवार, दि. 08 फेब्रुवारी, 2027 ते मंगळवार, दि. 16 मार्च 2027 या कालावधीत घेतली जणार आहे.

​SSC Exam Date 2027

  • माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 10वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा गुरुवार, दि. 28 जानेवारी 2027 ते शनिवार, दि. 13 फेब्रुवारी 2027 या दरम्यान घेतल्या जाणार आहेत.
  • प्रत्यक्ष ​लेखी परीक्षा सोमवार, दि. 15 फेब्रुवारी, 2027 ते गुरुवार, दि. 11 मार्च 2027 या दरम्यान घेतल्या जाणार आहेत.

​SSC HSC Exam importance

  • विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन करता यावे आणि परीक्षेच्या ताणातून मुक्त राहता यावे, यासाठी या संभाव्य तारखा वेळेआधीच जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य नियोजन करता यावे.
  • ​ सोबत जोडलेल्या पत्रानुसार दिलेल्या तारखा केवळ संभाव्य व सर्वसाधारण कालावधी दर्शवणाऱ्या आहेत.

SSC HSC Exam Date 2027

  • प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा तसेच लेखी परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक लवकरच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल.

बोर्ड परीक्षा बाबत विद्यार्थी आणि पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

  • आतापासूनच वेळापत्रकाचा अंदाज घेऊन अभ्यासाचे योग्य टाईमटेबल तयार करावा
  • विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी आणि ताज्या अपडेटसाठी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahahsscboard.in) नियमित लक्ष ठेवावे.
  • प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या मधल्या कालावधीचा सदुपयोग करून रिव्हिजनवर भर द्यावा.
  • ​सर्व विद्यार्थ्यांना आगामी 2027 मध्ये होणाऱ्या  SSC HSC Exam Date 2027 परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा!

मित्रहो ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही परीक्षेच्या तारखांची पूर्वकल्पना मिळेल.

Leave a Comment

error: कॉपी करताय???