RIMC Exam 2024: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता 8 वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे” ही परीक्षा दिनांक 01 डिसेंबर, 2024 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. सदर RIMC Exam 2024 परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात.
RIMC Exam 2024: सैनिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी परीक्षेची तारीख जाहीर इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्याना सुवर्णसंधी
RIMC Exam 2024: सैनिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी परीक्षेची तारीख जाहीर इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्याना सुवर्णसंधी
RIMC Exam 2024 विद्यार्थी शैक्षणिक पात्रता
- RIMC Exam 2024 साठी विद्यार्थी विद्यार्थीनी (उमेदवार) दि. 01 जुलै, 2025 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7वी वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा.
RIMC Exam 2024 विद्यार्थ्यांच्या वयाची अट
- RIMC Exam 2024 या परीक्षेसाठी विद्यार्थी / विद्यार्थीनीचे वयोमर्यादा (वय) दिनांक 01 जुलै, 2025 रोजी 11 (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि 13 (तेरा) वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजेच विद्यार्थी / विद्यार्थीनीचा जन्म दिनांक 02 जुलै 2012 च्या आधीचा व दिनांक 01 जानेवारी 2014 च्या नंतरचा नसावा.
RIMC Exam Fees परीक्षा फिस
- सर्वसाधरण व इतर संवर्गाकरिता रु. 600/-
- अनुसूचित जाती/जमाती करीता रु. 555/-
RIMC Exam 2024 साठी फॉर्म कसा भरावा
परीक्षेचे माहितीपत्रक, RIMC Exam 2024 चे फॉर्म व जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून उत्तराखंड पिन कोड- 248005 यांचेमार्फत खालील पद्धतीने मागविता येईल
- ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) व जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून RIMC यांच्याकडून मागविण्याकरीता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या https://www.rime.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सर्वसाधरण व इतर संवर्गाकरिता रु. 600/- व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. 555/- पैसे भरून आवेदनपत्राची (फॉर्मची) मागणी आपणास करता येईल.
- डिमांड ड्राफ्ट द्वारे परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता सर्वसाधरण संर्वगातील विद्यार्थी (उमेदवार) करीता रु. 600/- चा डी.डी. व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. 555/- चा डी.डी THE COMMANDANT RIMC FUND, DRAWEE BRANCH, HDFC BANK, BALLUPUR CHOWK, DEHRADUN, (BANK CODE 1399), UTTARAKHAND यांचे नावाने काढावा. सदर डी. डी. THE COMMANDANT “RASHTRIYA INDIAN MILITARY COLLEGE, DEHRADUN, UTTARAKHAND, 248003 या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत छायांकितप्रत पाठविणे बंधनकारक आहे.
- डी.डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा.
- तसेच इंग्रजी कॅपिटल अक्षरातच लिहिलेला अथवा टाईप केलेला असावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तिका स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होईल.
महत्वाचे म्हणजे परीक्षेसाठी मा. कमांडंट “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेमार्फत पुरवलेलेच आवेदनपत्र वैद्य/ग्राह्य धरले जाईल.
- परीक्षेसाठी मा. कमांडंट “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाचे आहे. स्थानिकरित्या छपाई केलेले छायांकित प्रतीतले व RIMC चा होलोग्राम नसलेले आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाहीत.
- आवेदनपत्र शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही.
RIMC Exam आवश्यक कागदपत्रेः
- आवेदनपत्र (फॉर्म) 2 (दोन) प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे.
- त्यासोबत खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे..
- जन्म दाखल्याची छायाप्रत (राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली झेरॉक्स कॉपी)
- उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) प्रमाणपत्र छायाप्रत (राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली झेरॉक्स कॉपी)
- अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी).
- विद्यार्थ्याचा फोटो, जन्मतारीख व इयत्तेच्या नोंदीसह शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे.
- आवेदनपत्रासोबत विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आधारकार्ड छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) जोडणे. बंधनकारक आहे आणि ते जमा न केल्यास विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आवेदनपत्र (फॉर्म) रद्द करण्यात येईल.
- विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो (मागील बाजूस विद्यार्थ्याच्या सहीसह)
- उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत साक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत) जोडावेत.
सूचना : आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्यमंडळ) भांबुर्डा, आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर पुणे 411004 या पत्त्यावर दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत. कुठल्याही परिस्थितीत आवेदनपत्र RIMC, कडे जमा करु नयेत.
RIMC Exam Schedule 2024
- परीक्षा नाव – RIMC Exam 2024
- परीक्षा दिनांक – 01 डिसेंबर 2024
- परीक्षा वार – रविवार
- परीक्षा एकूण गुण – 400
- परीक्षा विषय गणित सामान्य ज्ञान इंग्रजी
- अधिक माहितीसाठी
Phone No. 020 29709617
Email: mscepune@gmail.com https://www.mscepune.in/
लेखी परीक्षेतून मौखिक परीक्षेस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना (उमेदवारांना) मौखिक परीक्षा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल.