Pariksha Pe Charcha 2024: परीक्षेत येणारा ताण-तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा मोलाचा सल्ला

Pariksha Pe Charcha 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी पालक शिक्षक  याच्यातही मोलाचे सल्ले दिले. परीक्षा पे चर्चा 2024 हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम असून या वर्षीचा सातवा पर्व होता. Pariksha काळातील ताण हलका करण्यासाठी PM Narendra Modi स्वतः या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्या प्रश्नाची उत्तरे देतात. Pariksha Pe Charcha 2024 या कार्यक्रमामधील हा दुसरा भाग आहे. [ पहिला भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा ]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Pariksha Pe Charcha
Pariksha Pe Charcha

 

Pariksha Pe Charcha 2024: परीक्षेत येणारा ताण-तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा मोलाचा सल्ला

या भागामध्ये परीक्षा काल आणि जीवनशैली, करिअरची निवड, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा विश्वास तसेच तंत्रज्ञान आणि समाज माध्यमाचा वापर या सारख्या प्रश्नाची समर्पक उत्तरे यामध्ये दिली आहेत. Pariksha Pe Charcha 2024 यामध्ये विचारलेल्या प्रश्नासह सविस्तर पहा

परीक्षेची तयारी आणि निरोगी जीवनशैली याचा समतोल कसा सांभाळावा? Pariksha Pe Charcha

राजस्थान, लदाख आणि अरुणाचल प्रदेश येथील विद्यार्थ्यांनी अनुक्रमे व्यायाम & अभ्यास, परीक्षा तयारी आणू आरोग्य आणि खेळ मनोरंजन आणि अभ्यास याचा समतोल कसा सांभाळावा याविषयी मार्गदर्शन मागितले.

याविषयी बोलताना PM Narendra Modi म्हणतात की, जसे मोबाईल सुरळीत चालावा यासाठी वेळेच्या वेळी चार्जिंग करणे आवश्यक आहे तसेच हे शारीरिक व्यायाम हे ही सुदृढ जीवनशैलीसाठी एक प्रकारचे चार्जिंग आहे. परंतु काही वेळा विरोधाभास अस दिसून येतो की काही विद्यार्थी हे खेळतच असतात.काही विद्यार्थी हे शारीरिक आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. असे न करता यामध्ये संतुलन असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनी कोवळे सूर्यप्रकाश, झोप पूर्ण घेणे, आहार संतुलन या गोष्टीकडे लक्ष देणे आवशयक आहे. पुढे Pariksha Pe Charcha 2024 कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात “जितना खेलोगे उतना खिलोगे”. जागृत असे राहा की पूर्ण जागरूक असले पाहिजे आणि आणि झोप अशी घ्या की पूर्ण गाढ झोप झाली पाहिजे. जसे आपण दररोज ब्रश करतो तसे नियमित Exercise करावी.

करियर बाबत निर्णय कसे घ्यावेत?

कोलकता आणि हरियाणा येथील विद्यार्थ्यांनी करिअरच्या बाबतीत अनभिज्ञ असलेले किंवा जास्त भीती वाटते? आवडीच्या विषय निवडला की त्याविषयी बोलणे ऐकावे लागते? अशावेळी काय करावे?

करिअरच्या बाबतीत निर्णय घेताना स्वतः वर आत्मविश्वास असावा. आपल्या विचारांमध्ये द्विधा मनस्थिती असू नये. PM Narendra Modi म्हणतात, मनस्थिती द्विधा झाली की आपण निर्णय घेणताना प्रत्येकाना विचारत बसतो, इतरांचे सल्ला घेत बसतो. या द्विधा मनस्थिती मुळे निर्णय घेण्यात अडचण येते. तेव्हा अनिर्णयाक, अनिश्चितता यापासून दूर राहिले पाहिजे. त्या ऐवजी विषयाचा सर्व बाजूने विचार करून निर्णय शक्ती वाढवली पाहिजे.

आपल्यामध्ये आत्मविश्वास आणि सामर्थ्य आले पाहिजे. हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत झोकून दिले पाहिजे. यश नक्कीच मिळते परंतु त्यासाठी आपण निर्णायक परिस्थिती पर्यंत पोहचणे आवश्यक आहे. निर्णय घेण्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे सर्व मुद्यांचा विचार सकारात्मक आणि नकारात्मक विचार करावा. हेच सूत्र करियरच्या बाबतीत लागू पडते.

RTE Online Admission 2024-25

RTE प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

RTE मोफत प्रवेश संपूर्ण माहिती

पालक आणि विद्यार्थी यांच्यातील विश्वास स्थापन करणे

पदुचेरी येथील विद्यार्थी परीक्षा काळामध्ये कष्ट घेतात हा विश्वास पालकांना कसा पटवून द्यावा. याविषयी विचारणा केली.

Pariksha Pe Charcha कार्यक्रमातील सर्वात महत्वाचं प्रश्न म्हणून या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे. ट्रस्ट डेफीशीटअसणे ही खूप मोठी गोष्ट आहे. या गोष्टीवर पालक आणि शिक्षकांना विचार करण्याची गरज आहे. कारण पारिवारिक जीवनामध्ये असा अविश्वास असणे म्हणजे चिंतेचा विषय आहे. हे टाळण्यासाठी ट्रस्ट डेफीसीएट का आला आहे? याचं कारण शोधावे. आई-वडिलांनी पण या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. कृती मागे अनावश्यक कारणे जोडू नये.

आई वडील शिक्षक पालक यामध्ये कम्युनिकेशन चांगले असावे. कारण यामुळे काय होते प्रथम विश्वास त्यानंतर नात्यामध्ये दरी पडणे आणि त्याच्यानंतर डिप्रेशन येणे या गोष्टी घडतात. डिप्रेशन नंतर याचे विपरीत परिणाम दिसून येतात. विद्यार्थी शिक्षक असेच मोकळेपणाने नाते असावे. सर्व विद्यार्थी समान असावेत. विद्यार्थ्यांसोबत आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. सकारात्मकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. एकदा का हा विश्वास उठला तर पुढे यामुळे वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाचे कारण दिले असेल तर केवळ अभ्यासच करावेत. अभ्यासाचे कारण देऊन इतर कामे करू नये। यासाठी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी विविध उदाहरणे देऊन उत्तरे सांगितली.

Pariksha काळात समाजमाध्यमाचा वापर कसा करावा

पुणे झारखंड आणि हिमाचल प्रदेश येथील पालकांनी प्रश्न विचारला की तंत्रज्ञानावर अलीकडील मुले हे अधिक विसंबून राहतात डोक्यांचा वापर कमी करतात अशा वेळी समाज माध्यमांचा वापर किती करावा जीवनात समाज माध्यमांचा दबाव वाढला की तंत्रज्ञान अधिक विकसित झालेली आहे याविषयी मार्गदर्शन करावे?

व्यक्तींच्या जीवनामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती म्हणजे अतिवापरापासून दूर राहणे. अति तिथे माती ही होत असते. त्यामुळे तंत्रज्ञानाबाबत सुद्धा ही गोष्ट महत्त्वाची ठरते.

  • अतिवापरापासून दूर राहावे.
  • ठराविक वेळेतच त्याचा वापर करावा.
  • तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा.
  • विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा स्क्रीन टाईम कमी करावा
  • मध्यम किंवा तंत्रज्ञान ताकद ओळखावी.
  • सकारात्मक गोष्टी त्यापासून घ्याव्यात.
  • तंत्रज्ञानापासून दूर पडण्याची गरज नाही.
  • तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करावा.

[ पहिला भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा ]

1 thought on “Pariksha Pe Charcha 2024: परीक्षेत येणारा ताण-तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा मोलाचा सल्ला”

Leave a Comment

error: कॉपी करताय???