Pavitra Portal Bharti Phase 2 List: नुकतेच शिक्षक पदभरती टप्पा 2 बाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.

Pavitra Portal Bharti Phase 2 List : दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीसह शिक्षक भरतीची यादी जाहीर; इथे पहा यादी
Pavitra Portal Bharti Phase 2 List
यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/
यादी पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड वर क्लिक करून आवश्यक ती यादी डाउनलोड करावी.
- महत्वाचे अपडेट इथे पहा
- कल्याण डोंबिवली मध्ये विविध पदांची भरती
- अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक पहा
- दहावी पास विद्यार्थ्याना फ्री टॅब्लेट मिळणार
मुलाखतीसह शिक्षक भरतीसाठी सूचना
- पवित्रप्रणालीअंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 नुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 21678 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये “मुलाखतीशिवाय” या प्रकारांतील पदभरतीची कार्यवाही करण्यात आली.
- आता दुसऱ्या टप्प्यांतर्गत “मुलाखतीसह” पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Pavitra Portal Bharti Phase 2 List With Interview
- मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मध्ये एकूण 30 गुणांची तरतूद करण्यात आली आहे.
- पात्र उमेदवाराची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थास्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबिण्यात येत होती. अशा परिस्थितीत शिक्षक पदभरतीमध्ये एकवाक्यता (Uniformity) साधण्याच्या दृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा (SOP_Standard Operating Procedure) अवलंब करणे आवश्यक आहे.
- याशिवाय सन 2019 च्या शिक्षक पदभरतीच्या वेळी विविध शैक्षणिक संस्थांची गरज लक्षात घेता, मानक कार्यपद्धती (SOP) सर्वांच्याच दृष्टीने आवश्यक होती. यासाठी शासन पत्र दिनांक 06/08/2024 अन्वये मानक कार्यपद्धती (SOP_Standard Operating Procedure) निश्चित केली आहे.
Pavitra Portal Bharti Phase 2 List
- “मुलाखतीसह” शिक्षक पदभरतीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी / इयत्ता सहावी ते आठवी / इयत्ता नववी ते दहावी/ इयत्ता अकरावी ते बारावी/अध्यापक विद्यालये या गटातील शिक्षणसेवकांच्या/शिक्षकांच्या 8556 रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
- 1861 व्यवस्थापनातील 8556 रिक्त पदांपैकी 8264 पदांसाठी 12966 उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून जास्तीतजास्त 10 प्राधान्यक्रमांसाठी एकूण 71802 प्राधान्यक्रमावर शिफारस करण्यात आली आहे.
- नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध केलेली होती, परंतु विविध प्रशासकीय कारणास्तव 81 व्यवस्थापनांच्या एकूण 177 पदे जाहिरातीतून रद्द करण्यात आलेली आहेत.
- त्यामुळे सदर पदांसाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही. अशा व्यवस्थापनांतील कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीस देण्यात येत आहे.
- 6. सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन मा. उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
Pavitra Portal Bharti Phase 2 List उमेदवार सूचना
- मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा. जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना निवडप्रक्रियेबाबत सविस्तर सूचना देण्यात येत आहेत.
- जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवडप्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
- निवडप्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास, त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
- निवडप्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांचेकडे अर्ज करता येईल. उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा / कागदपत्र सोबत जोडावेत.
- शिक्षणाधिकारी यांच्यास्तरावरून निराकरण न झाल्यास ल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यांसह व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारअर्जासह अपील-अर्ज दाखल करता येईल.
- मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी निवडप्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंब करू नये.
- शिक्षक पदभरतीच्या “मुलाखतीसह” या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरीदेखील या संदर्भात अभियोग्यताधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास, अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती (Grievance Redressal and Correction Committe) कडे pavitra2022grcc@gmail.com या ई-मेलवर सबळ पुराव्यांसह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कुणीही ग्रुप ईमेल पाठवू नयेत.
- उमेदवारांव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी, संस्थांनी, संघटनांनीही या ईमेलवर पाठविल्यास असे ई-मेल दुर्लक्षित करण्यात येतील. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये. विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा