Documents For RTE Admission | आरटीई 25% मोफत प्रवेशासाठी कागदपत्रांची संपूर्ण यादी पहा

Documents For RTE Admission: दरवर्षी RTE Act 2009 नुसार राज्यामध्ये Free Admission दिले जाते.  मोफत प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाकडून 2024-25 वर्षासाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. RTE 25% मोफत प्रवेशसाठी पालकांना ऑनलाईन फॉर्म RTE 25% Admission Portal वर भरावे लागते. त्यासाठी पालकांकडे मुलाच्या बाबतीत खालील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अनेकदा पालकांकडे  कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे प्रवेशास अडचण येते. त्यासाठी याठिकाणी RTE Admission Documents  विषयी सविस्तर माहिती दिली आहे. RTE 25% Admission साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्वांनी माहिती वाचून त्यानुसार कागदपत्रे जमा करावीत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Documents For RTE Admission
Documents For RTE Admission

 

आर.टी.ई. २५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे यादी- Documents For RTE Admission

RTE Admission दरवर्षी आर.टी.ई.२५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. अनेकदा पालकांकडे RTE Admission साठी आवश्यक असलेल्या कागदपत्र विषयी माहिती नसल्यामुळे RTE Free Admission पासून वंचित राहतात. त्यामुळे पालकांना RTE प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रांविषयी माहिती व्हावी म्हणून याठिकाणी Required Document for RTE Admission माहिती दिली आहे.

Important Instruction about Document for RTE Admission 

RTE 25% online Admission करिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी RTE Online Admission Application भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. पालकांनी याची नोंद घ्यावी.

आरटीई 25% प्रवेश करिता बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आरटीई प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत.

वंचित गटामध्ये येणारी बालके:-

1) जात संवर्गातील :- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती (ब) भटक्या जमाती (क) भटक्या जमाती, (ड) इतर मागास (ओ.बी.सी.) विशेष मागास बालके (एस.बी.सी.)

2) दिव्यांग बालके,

3) एच.आई.व्ही.बाधित किंवा एच.आई.व्ही प्रभावित बालके,

4) कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन)

5) अनाथ बालके

अनाथ बालकाच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे –RTE Admission Document

1) अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची / बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत.

2) जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील.

3) अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला इ. विचारात घेण्यात येऊ नयेत.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला

तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, salary स्लीप, कंपनीचा किंवा Employer चा दाखला, (आर्थिक वर्ष 2020-21 किंवा मार्च 2022-23 अखेरचे एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले) उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही

घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे

1) न्यायालयाचा निर्णय.
2) घटस्फोटित महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला

न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला

1) घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा.
2) घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला

विधवा महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे

1) पतीचे मृत्यूपत्र (प्रमाण पत्र)
2) विधवा महिलेचा /बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

आधार कार्ड

वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे. आर.टी.ई.25 टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी / पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे बालक / पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे / पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधारकार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आर.टी.इ.25टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी.

जन्मतारखेचा पुरावा DOB Document for RTE Admission

वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक यासाठी ग्रामपंचायत /न.पा./ म.न.पा. यांचा दाखला / रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला / आंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला / आई, वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन वापरू शकतो.

रहिवासाचा / वास्तव्याचा पुरावा Residential Document for RTE Admission

 

वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक  पुरावा आहे. यासाठी रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालविण्याचा परवाना.), वीज/ टेलिफोन बिल देयक, पाणी पट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक/ घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट या पैकी कोणतेही एक. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. Documents For RTE Admission भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

RTE Online Admission 2024-25

RTE प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

RTE मोफत प्रवेश संपूर्ण माहिती

FAQ वारंवार विचारली जाणारी प्रश्न

प्रश्न – वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र (वडिलांचे/बालकाचे): उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता असते का?

उत्तर वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र (वडिलांचे/बालकाचे): उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकतानाही.

प्रश्न: जातीचा दाखला कोणत्या अधिकारी यांनी दिलेला असावा?

उत्तर तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी/उपविभागीय महसूल अधिकारी याांचे प्रमाणपत्र. पालकाचा (वडिलांचा/बालकाचा) जातीचा दाखला आवश्यक. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.

प्रश्न : RTE मोफत प्रवेश दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळतो का?

उत्तर होय, RTE मोफत प्रवेश दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळतो. दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश वंचित घटकामध्ये केला जातो.

प्रश्न RTE Admission साठी दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाण पत्राचा पुरावा कोणता असाव?

उत्तर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाण पत्राचा पुरावा  जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय याांचे 40 टक्के आणि त्या पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.

एच.आय.व्ही. बाधित / प्रभावित असल्यास प्रवेश मिळतो का कोणते पुरावे आवश्यक आहे?

होय. प्रवेश मिळतो आवश्यक कागदपत्रे: जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र

अ) कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे – वंचित गटातील बालकांमध्ये कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे.

अ) सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबधित पालकाचे मृत्यु प्रमाणपत्र

ब) कोव्हीड 19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र. (Medical Certification of Cause of Death (Form No.4), (SeeRule7)) सदर मृत्यू कोव्हीड 19 शी संबधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय/पालिका/महानगरपालिका, रुग्णालय अथवा आय.सी.एम.आर. नोंदणीकृत खाजगी रुग्णालय/प्रयोगशाळा यांचा अहवाल.

9 thoughts on “Documents For RTE Admission | आरटीई 25% मोफत प्रवेशासाठी कागदपत्रांची संपूर्ण यादी पहा”

Leave a Comment

error: कॉपी करताय???